पुणे :
डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी(आंबी ,पुणे ) च्या वतीने ‘होनहार भारत -लीडरशिप माईंडसेट ‘ या संकल्पनेवर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि.८ ते १० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत करण्यात आले आहे.शाश्वत आर्थिक प्रगती,सामाजिक विकास,पर्यावरण संवर्धन,सुशासन अशा विषयावरील मार्गदर्शन सत्रे,उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या योगदानाबद्दल कंपन्या आणि मान्यवरांचा सत्कार असे या राष्ट्रीय परिषदेचे स्वरूप आहे.एकूण ४० वक्ते,१ हजार मान्यवर आणि विद्यार्थी या परिषदेत सहभागी होणार आहेत.सर्व मार्गदर्शन सत्रे आंबी शैक्षणिक संकुलात होणार आहेत.
डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटीच्या कुलगुरु डॉ.सायली गणकर, युनिव्हर्सिटीचे स्ट्रॅटेजी डायरेक्टर कर्नल सुनील भोसले(निवृत्त)यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या परिषदेच्या उदघाटन कार्यक्रमात ‘क्विक हिल’कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास काटकर,इंटेलीमेन्ट कंपनी चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत पानसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून समारोप कार्यक्रमात बार्कलेज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण वूक्कलम,एक्सेंचर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कालगुडे उपस्थित राहणार आहेत.’होनहार भारत’ राष्ट्रीय परिषदेचे हे दुसरे वर्ष आहे.