कोविड महामारी काळात अनेक उद्योजक परस्पर संपर्कासाठी स्नो या ऑन लाईन व्यासपीठावर एकत्र आले होते. कोविड नंतरच्या काळातही त्यांनी संपर्क कायम ठेवला व ते विविध उपक्रमासाठी एकत्र येतात. याच अनुषंगाने उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्यानचे आयोजन करण्यात आले. हॉटेल डेक्कन रॉयल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगी स्नो चे संस्थापक दीपक तोषणीवाल, अध्यक्ष जितेंद्र शिर्षीकर, उपाध्यक्ष ऋषिकेश कुलकर्णी, डायरेक्टर शंकर मृदा, खजिनदार भूषण यंदे, मार्गदर्शक व्याख्याते योगेश शिंदे (बांबू इंडिया)आदी मान्यवर उपस्थित होते.
छायाचित्र : मान्यवर व उद्योजक यांचे समूहचित्र.