फिट येणे(अपस्मार) च्या गंभीर रुग्णांवर औषधांचा परिणाम होत नाही.तर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करून बधित भाग काढून टाकावा लागतो. रोटरी क्लब बाणेरच्या वतीने “एपिलेप्सी सर्जरी प्रकल्पा”अंतर्गत ३ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. नुकतीच रोटरी क्लब बाणेरचे अध्यक्ष जिग्नेश कारिया व सचिव रजत चित्रवंशी यांच्या पुढाकाराने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉ.निलेश कुरवाळे यांनी ती केली.हा प्रकल्प २०२१-२२ या वर्षात संकेत सराफ यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला आहे. या यशस्वी शस्त्रक्रिये मुळे या ४ वर्ष,६ वर्ष व २४ वर्षीय रूग्णांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनास नवजीवन प्राप्त झाले आहे व हा प्रकल्प यापुढेही सुरू राहील असे जिग्नेश कारिया यांनी नमूद केले.
छायाचित्र : यशस्वी शस्त्रकिये नंतर.