एक रविवार आपल्या विशेष बंधू भगिनी साठी! वी फाऊंडेशन चा स्तुत्य उपक्रम! वी फाऊंडेशन व”आम्ही पुणेकर” च्या वतीने कौन बनेगा करोड पती चे प्रथम विजेता हर्षेवर्धन नखाते यांच्या ५0व्या वाढदिवसानिमित्त आपल्या समाजातील दृष्टी बाधित समुदायाला समर्पित एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करीत आपण सर्व आपल्या मित्र व परिवार सोबत चित्रपट पाहण्याचा आनंद घेत असतो. पण यावेळेस वार्शिप अर्थ फाऊंडेशन च्या पुढाकाराने एक सामाजिक बांधिलकी म्हणून अंध, अपंग, दिव्यांग बंधु भगिनी सोबत चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला. “दयाळूपणा ही दृष्टीदोष असणाऱ्या व्यक्तीला दिसणारी भाषा आहे” या भावनेवर आमचा मनापासून विश्वास आहे. हा विचार व्यक्त करणे आणि प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करणारे आणि आदर देणारे जग निर्माण करणे हे या मागील आमचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमासाठी, काही पुणेकरांनी मोठया आपुलकीने तिकीट डोनेट केलें. अधिक सखोलपणे सहभागी होण्यासाठी आमंत्रित अंध विशेष व्यक्ती सोबत चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला. यावेळेस वी फाऊंडेशन, वी पुणेकर, साथी फाऊंडेशन, दृष्टिहीन संस्था. चे पदाधिकारी, पराग मते, तेजस गुजराथी, राज देशमुख, आम्रपाली चव्हाण रीना मॅडम अमोल पवार सुरज शिराळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळेस अनेक अंध व्यक्ती यंनी चित्रपट चा अनुभवाने भारावून गेले. चित्रपट ठिकाण – सिटीप्राईड, पुणे सातारा रस्ता. मार्केट यार्ड जवळ. पुणे. चित्रपट दिनांक- 30 जुलै 2023,