हडपसर शाखेच्या गणेश जगताप यांनी एकाच दिवसात १०१ पॉलिसी करण्याची कामगिरी सलग दुसर्या वर्षी केली. गणेश जगताप मागील २१ वर्षापासून विमा प्रतींनिधी म्हणून काम करत आहेत, ही कामगिरी करण्यामध्ये त्यांना प्रामुख्याने त्यांचे सर्व ग्राहक त्यांचे हितचिंतक तसेच त्यांच्या ऑफिस मधील सहकारी यांचे सहकार्य लाभले. ही कामगिरी करण्यामध्ये त्यांना त्यांचे विकास अधिकारी दीपक वेताळ, ऊरुळी कांचनचे ब्रांच मॅनेजर भोंगळे सर, हडपसर शाखेचे सिनियर ब्रांच मॅनेजर अरुण मिरगे,ब्रांच मॅनेजर घनश्याम काळे यांचे मार्गदर्शन लाभले. पुणे विभाग दोन मधून ही कामगिरी करणारे ते पहिले विमा प्रतिनिधी ठरले आहेत.
छायाचित्र : १) गणेश जगताप,२)गणेश जगताप यांचा सत्कार करतांना मान्यवर.