रोटरी क्लब स्पोर्ट सिटी व पबमॅटीकच्या वतीने आयटीआय औंध येथील खेळाच्या मैदानाचे पुनर्निर्माण केले.

Share This News

रोटरी क्लब पुणे स्पोर्ट सिटीने आंतर्राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍या पबमॅटीक कंपांनीच्या सहकार्याने शासकीय आयटीआय औंध येथील खेळाच्या मैदानाचे पुननिर्माण केले.यासाठी पबमॅटीक कंपनीने ४ लाख रुपये सामाजिक जबाबदारी म्हणून सीएसआर फंडातून प्रदान केले. याचा लाभ येथील सुमारे २५०० विद्यार्थ्यांना होणार आहे. रोटरी क्लब स्पोर्ट सिटीने याचे व्यवस्थापन केले. याचे उद्घाटन पबमॅटीकचे संस्थापक मुकुल कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. पबमॅटीकचे अन्य अधिकारी रोटरी स्पोर्ट सिटीचे सदस्य व आयटीआयचे प्राचार्य रमाकांत भावसार,प्रकल्प समन्वयक नितिन जोशी,अमित वंजारी , आयटीआय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.फुटबॉल,क्रिकेट,बास्केट बॉल,खोखो,व्हॅलीबॉल या सारखे अनेक खेळ या विद्यार्थ्यांना खेळता येणार आहेत.