रोटरी क्लब पुणे ३७ च्या संस्थापक अध्यक्षपदी वैभव शहा यांची निवड करण्यात आली. मोना लोढा यांची उपाध्यक्षपदी,तसेच राहुल संचेती यांची सचिवपदी निवड करण्यात आली. लॉफ्ट ४८ हॉटेल एनआयबीएम रस्ता येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी ३१३१ चे प्रांतपाल डॉ.अनिल परमार, ऊपप्रांतपाल मोहन पालेशा, मेंबरशीप डायरेक्टर पंकज पटेल, सल्लागार किशोर ओसवाल, भावी प्रांतपाल शितल शहा आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी व कुटुंबिय उपस्थित होते. दिपप्रज्वलना नंतर रोटरी क्लब पुणे ३७ ची मान्यता सनद(चार्टर)प्रांतपाल अनिल परमार यांनी वैभव शहा यांना प्रदान केली. या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित अध्यक्ष शहा यांनी आगामी काळात सामाजिक,शैक्षणिक व आरोग्य आणि पर्यावरण व गोर गरिबांसाठी समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले. अनिल परमार यांनी बोलतांना नवा क्लब असल्याने जुन्या जाणत्या लोकांचे मार्गदर्शन व नव्या लोकांचा सहभाग यांचा समन्वय करून समाजाची सेवा करावी असे प्रतिपादन केले.
छायाचित्र : वैभव शहा.