विज्ञान-तंत्रज्ञान- कौशल्य विकास विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी मनोज राजेंद्र पाटील.

Share This News

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत विज्ञान तंत्रज्ञान कौशल्य विकास विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आले आहे. मा.नानासाहेब पटोले प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या उपस्थितीतीमध्ये विज्ञान तंत्रज्ञान कौशल विकास विभागाचे अध्यक्ष सुरेश यादव यांनी मनोज पाटील यांची निवड झाल्याचे पत्र दिले आहे. हा कार्यक्रम सोमवार दिनांक १ मे २०२३ रोजी टिळक भवन दादर मुंबई काँग्रेस कार्यालय येथे माननीय आमदार अमित झनक,महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी सुजाता चिंता,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील,दिलीपराव सरनाईक,जि.प.उपाध्यक्ष शाम गाभणे,सभापती चक्रधर गोटे,दिलीप भोजराज यांनी पत्र देवून मनोज पाटील यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी पुणे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी संघटक सचिव गोरख पळस्कर, अरविंद पाटील,राजाभाऊ चौधरी,विशाल सोमटकर,नंदा गनोदे,महादेव सोळंके,संतोष दिवटे,गजानन गोटे,मिलिंद पाकधाने,सिद्धार्थ सावध उपस्थित होते. या निवडीबद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मनोज पाटील यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की मा.सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी,प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,सुरेश यादव,काँग्रेस कमिटी यांचे विचार सर्वसामान्य नागरिक व युवक विद्यार्थी यांच्या प्रति विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कौशल्याचे विविध उपक्रम राबवून राजीव गांधी यांच्या विचारातील कार्य आपण पुढे घेवून जाणार आहोत अशी प्रतिक्रिया दिली. मनोज पाटील हे भरत मित्र मंडळ अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर यांचे धडाडीचे कार्यकर्ते असून कायम मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये काम करत असतात.    

छायाचित्र : १) मनोज पाटील २) नियुक्तीपत्र देतांना मान्यवर.