रोटरी इंटरनॅशनलच्या वतीने विविध देशातील संस्कृतीचा परिचय –आदान प्रदान यासाठी रोटरी युथ एक्स्चेंज कार्यक्रम राबविला जातो.या अंतर्गत ब्राझिल,स्पेन,जपान,फ्रांस,जर्मनी आदी देशांतील १२ युवक युवती भारतात वास्तव्यास होते. त्यांचा निरोप समारंभ व पुरस्कार वितरण बाणेर येथील स्पाईस कोर्ट हॉटेल येथे संपन्न झाला.या कार्यक्रम प्रसंगी रोटरी इंटरनॅशनलचे डायरेक्टर डॉ॰ महेश कोटबागी, रोटरी प्रांत ३१३१चे प्रांतपाल डॉ.अनिल परमार, माजी प्रांतपाल रश्मि कुलकर्णी,शितल शहा,संतोष मराठे,आरवायई डायरेक्टर शोभा नहार,रोटरी क्लब खडकीच्या अध्यक्ष किर्ति केळकर,रोटरी क्लब निगडीच्या अध्यक्ष प्राणिता अलुरकर,रोटरी क्लब सहवासचे अध्यक्ष अजय मुटाटकर,रोटरी क्लब टिळकरोडचे अध्यक्ष सत्यजित बडवे,प्रिया कारिया,सारिका रोडे,शिल्पा तोषणीवाल.आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी सदस्य,तसेच या विद्यार्थ्यांचे भारतातील पालक उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना महेश कोटबागी यांनी मार्गदर्शन करतांना निरोप समारंभ हा शेवट नसून आगामी संबंधाची सुरुवात आहे असे प्रतिपादन केले. डॉ.अनिल परमार यांनी या कार्यक्रमातून दोन देशच नाही तर दोन कुटुंब व संस्कृती सुद्धा एकत्र येतात असे संगितले.
छायाचित्र :परदेशी युवक युवती व रोटरी पदाधिकारी यांचे सामूहिक छायाचित्र.