राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस राहुल पायगुडे यांनी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. यात जीवनशैलीमुळे होणारे आजार जसे मधुमेह व रक्तदाब याची तपासणी करण्यात आली. तसेच यातून कसे मुक्त होता येईल याचे मार्गदर्शन करण्यात आले. WWC –DIMBHA मिशन अंतर्गत प्रभाग १७ मधील सदाशिव, शनिवार,नारायण,शुक्रवार पेठेतील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी व जनजागृती अभियानाचे उद्घाटन प्रशांत जगताप यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी रवींद्र अण्णा माळवदकर,अंकुशअण्णा काकडे,बी राजकुमार,प्रदीप देशमुख,मिलिंद वालवडकर,बाळासाहेब दाभेकर,गणेश नलावडे,सरिता काळे,वनिता जगताप,रोहन पायगुडे,दीपक पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.