पुणे : भारतीय संघाने पोलंडला पराभूत करताना पुरुष गटातून वरिष्ठ गटाच्या सहाव्या रोलबॉल विश्वकरंडक स्पर्धेत विजयी सलामी दिली.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती स्टेडीयम येथे सुरु झालेल्या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन उच्च तंत्र, शिक्षण तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, उद्योगपती पुनीत बालन, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, रोलबॉल खेळाचे जनक राजू दाभाडे, यांच्यासह पुणे मनपाच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, ज्योती कळमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पर्धेसाठी सर्वच संघाना शुभेच्छा देताना भारतीय संघाच्या जर्सीचे अनावरण केले. पुण्यात जन्मलेला हा खेळ सुमारे ५० पेक्षा अधिक देशात खेळला जात आहे. सहावी विश्वकरंडक स्पर्धा पुण्यात होत असल्याचा आनंद होत आहे. या स्पर्धेत सुमारे २७ देश सहभागी झाले असून भविष्यात अजून देश सहभागी होतील, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.
उद्घातानावेळी शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या वतीने तलवारबाजी, भाले, ढाल-तालवर यांचे विविध प्रयोग करताना महाराष्ट्राची लोककला प्रदर्शित केली. रॅम्बो सर्कसच्या कलाकारांनी विविध कलाकारी सादर करताना स्पर्धेच्या उद्घाटनात जान आणली. यावेळी पोलीस बँडने देखील सर्वच देशांच्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी विविध गीते सादर केली. यामुळे खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला.
सलामीच्या लढतीत पुरुषांच्या गटात भारतीय संघाने पोलंड संघाला १४-१ अशा फरकाने पराभूत करताना विजयी सलामी दिली. मध्यंतराला भारतीय संघाने ८-० अशी आघाडी घेतली होती. भारताकडून आकाश गणेशवाडेने ४ (१२.३३, १३.५५, १४.२२ व ३२.०९ मिनिटे), हर्षल घुगेने २ (५.१० व ३१.० मिनिटे), सचिन सैनीने २ (२.४७ व ३९.०८ मिनिटे) मिहीर सानेने १ (६.३६ मिनिटे), श्रीकांत साहूने १ (१७.००मिनिटे), विकी सैनीने १ (१०.२४ मिनिटे), आदित्य सुतारने १ (२४.२० मिनिटे), गुरुवचन सिंगने १ (२६.५६ मिनिटे) व प्रदीप टी.ने १ (३६.४३ मिनिटे) गोल केला. पोलंड संघाकडून रडदिया सत्यमने (२५.२८ मिनिटे) एक गोल केला.
महिलांच्या गटातील इजिप्त व नेपाळ लढतीला सुरुवात झाली आहे. थोड्या वेळात अपडेटेड बातमी पाठवतो.पुरुष गटातून भारताची विजयी सलामी
सहावी विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धा : चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन
पुणे : भारतीय संघाने पोलंडला पराभूत करताना पुरुष गटातून वरिष्ठ गटाच्या सहाव्या रोलबॉल विश्वकरंडक स्पर्धेत विजयी सलामी दिली.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती स्टेडीयम येथे सुरु झालेल्या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन उच्च तंत्र, शिक्षण तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, उद्योगपती पुनीत बालन, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, रोलबॉल खेळाचे जनक राजू दाभाडे, यांच्यासह पुणे मनपाच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, ज्योती कळमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पर्धेसाठी सर्वच संघाना शुभेच्छा देताना भारतीय संघाच्या जर्सीचे अनावरण केले. पुण्यात जन्मलेला हा खेळ सुमारे ५० पेक्षा अधिक देशात खेळला जात आहे. सहावी विश्वकरंडक स्पर्धा पुण्यात होत असल्याचा आनंद होत आहे. या स्पर्धेत सुमारे २७ देश सहभागी झाले असून भविष्यात अजून देश सहभागी होतील, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.
उद्घातानावेळी शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या वतीने तलवारबाजी, भाले, ढाल-तालवर यांचे विविध प्रयोग करताना महाराष्ट्राची लोककला प्रदर्शित केली. रॅम्बो सर्कसच्या कलाकारांनी विविध कलाकारी सादर करताना स्पर्धेच्या उद्घाटनात जान आणली. यावेळी पोलीस बँडने देखील सर्वच देशांच्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी विविध गीते सादर केली. यामुळे खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला.
- सलामीच्या लढतीत पुरुषांच्या गटात भारतीय संघाने पोलंड संघाला १४-१ अशा फरकाने पराभूत करताना विजयी सलामी दिली. मध्यंतराला भारतीय संघाने ८-० अशी आघाडी घेतली होती. भारताकडून आकाश गणेशवाडेने ४ (१२.३३, १३.५५, १४.२२ व ३२.०९ मिनिटे), हर्षल घुगेने २ (५.१० व ३१.० मिनिटे), सचिन सैनीने २ (२.४७ व ३९.०८ मिनिटे) मिहीर सानेने १ (६.३६ मिनिटे), श्रीकांत साहूने १ (१७.००मिनिटे), विकी सैनीने १ (१०.२४ मिनिटे), आदित्य सुतारने १ (२४.२० मिनिटे), गुरुवचन सिंगने १ (२६.५६ मिनिटे) व प्रदीप टी.ने १ (३६.४३ मिनिटे) गोल केला. पोलंड संघाकडून रडदिया सत्यमने (२५.२८ मिनिटे) एक गोल केला.