कै.डॉ.विकास आबनावे यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

Share This News

कै.डॉ. विकास आबनावे यांच्या ६५ व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात सुमारे ५२ जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार ,संस्थेचे मानद अध्यक्ष मोहनदादा जोशी, विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे संचालक डॉ.दिलीप आबनावे, मा.आ.जयदेव गायकवाड, रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड, खजिनदार प्रथमेश आबनावे, जॉइन्ट सेक्रेटरी पुष्कर आबनावे, उद्योजक विनोद जाधव आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर,नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना डॉ. दिलीप आबनावे यांनी रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे कारण यामुळे जीवनदान मिळते असे संगितले.  

छायाचित्र : डॉ.दिलीप आबनावे.