“रोटरी युथ एक्स्चेंज उपक्रमामुळे फक्त दोन युवकच नव्हे तर दोन कुटुंबे व संस्कृती एकत्र येतात.” – रश्मी कुलकर्णी.

Share This News

रोटरी युथ एक्स्चेंज मुळे दोन देशांतील विद्यार्थीच नव्हे तर दोन कुटुंबे व संस्कृती एकत्र येतात.तसेच त्यांच्यातील संपर्क कायम रहातो” असे प्रतिपादन माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांनी केले.” रोटरी युथ एक्स्चेंज ३१३१च्या वतीने आयोजित मार्गदर्शन सत्रात त्या बोलत होत्या. विद्यार्थी सहाय्यक समितीच्या मोडक सभागृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी, रोटरी क्लब पुना मिडटाऊनच्या अध्यक्ष माधुरी कुलकर्णी, सचिव गौतम ईनामदार, दीपक बोधनी,क्रांती शहा, सी.डी.महाजन, सारिका रोडे, प्रिया कारिया, अशोक भंडारी आदी मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी व पालक तसेच या कार्यक्रमात सहभागी असलेले युवक युवती उपस्थित होते. यावेळी युवक व पालक यांच्या प्रश्नांना मान्यवरांनी उत्तरे दिली.  गौतम ईनामदार यांनी आभार प्रदर्शन केले.

छायाचित्र : मान्यवर,युवक युवती व पालक यांचे समूहचित्र.