“शुक्रांगणच्या वतीने, अविस्मरणीय युद्धकथा, सैनिकांचे प्रत्यक्ष अनुभव! कार्यक्रम संपन्न.

Share This News

रोटरी क्लब पुणे शुक्रांगणच्या वतीने “अविस्मरणीय युद्धकथा”, सैनिकांचे प्रत्यक्ष अनुभव! या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लबऑफ पुणे–प्राईड, सहवास, सारसबाग, पाषाण, युनिव्हार्सिटी, बिबवेवाडी, सिनर्जी, हिलसाईड, विज्डम, गणेशखिंड, हेरिटेज, वारजे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. मराठा चेंबर्सच्या सुमंत मुळगावकर सभागृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विंग कमांडर (रिटा.) विनायक डावरे व ग्रुप कॅप्टन (रिटा.) अनंत बेवुर यांनी १९६५, १९७१ चे भारत पाकिस्तान युद्ध तसेच भारताने सियाचीन ताब्यात घेण्यासाठी केलेल्या लढाया  व विविध लढाई व या मध्ये दिलेले बलिदान यांचे सविस्तर महितीपूर्ण सादरीकरण केले. तसेच श्रोत्यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. या कार्यक्रम प्रसंगी विंग कमांडर (रिटा.) विनायक डावरे व ग्रुप कॅप्टन(रिटा.) अनंत बेवुर यांना मानपत्र देवून गौरविण्यात आले. 

छायाचित्र :मानपत्र देतांना मान्यवर.