रोटरी क्लब औंध पुणेचे सामाजिक व लोकसेवेचे कार्य कौतुकास्पद आहे,विशेषत: पिंगोरी गावात ग्रामस्थांना डेअरी उभारून देणे(प्रकल्प खर्च ४५ लाख.). अशा कार्याने अनेक जणांना रोजगार मिळतो तसेच अन्य समाजसेवी व्यक्ति व संस्थांना प्रेरणा मिळते. असे प्रतिपादन रोटरीचे प्रांतपाल अनिल परमार यांनी केले. हॉटेल करोल बाग येथे संपन्न झालेल्या आढावा बैठकीस ते मार्गदर्शन करत होते .या कार्यक्रम प्रसंगी रोटरी प्रांत ३१३१ चे प्रांतपाल अनिल परमार, सहाय्यक प्रांतपाल संतोष परदेशी, हेमा परमार, रोटरी क्लब औंधचे अध्यक्ष सुखानंद जोशी, सचिव अजय देशकर,प्रकल्प व्यवस्थापनाचे रवी उलंगवार व बाबा शिंदे आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी क्लब पदाधिकारी,सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते.
छायाचित्र : मान्यवर व सदस्य यांचे समूहचित्र.