*लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त मोफत नेत्रचिकित्सा व शास्त्रक्रिया शिबीर संपन्न* *12 गरजू व्यक्तींवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया – सौ. मंजुश्री खर्डेकर.*

Share This News

भारतीय जनता पार्टी प्रभाग 13, क्रिएटिव्ह फाउंडेशन, म. ग. आचवल ट्रस्ट आणि नयनतारा आय क्लिनिक च्या सहकार्याने लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त भव्य नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष व मा.नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी एरंडवणे येतील दहा चाळ येथे आयोजित केलेल्या शिबिरात तब्ब्ल 12 गरजू व्यक्तींवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सौ. मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. शिबिराचा लाभ घेण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. ह्या शिबिरास मा. नगरसेवक व भाजपा पुणे शहर सरचिटणीस दीपक पोटे, नगरसेवक जयंत भावे, स्वीकृत सदस्य मितालीताई सावळेकर,सरचिटणीस प्राचीताई बगाटे, उद्योग आघाडीचे सरचिटणीस रामदासजी गावडे,ब्राह्मण संघाचे श्री. दत्तात्रय देशपांडे इ मान्यवर उपस्थित होते.
नयनतारा आय क्लिनिक चे डॉ. अनिल परांजपे आणि डॉ. मेधा परांजपे व त्यांच्या चमुने नेत्रतपासणी करून शस्त्रक्रियेसाठीच्या रुग्णांची निवड केली. उद्याच ह्या सर्वांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष संगीताताई आदवडे व संगीताताई वांद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आम्हाला सतत समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याची शिकवण दिली, त्यालाच अनुसरून त्यांच्या जयंती दिनी मोफत शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केल्याचे सौ. खर्डेकर यांनी स्पष्ट केले.