ज्ञानदीप सोशल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक जाणीव म्हणून ५० अंध बंधु भगिनींना दिवाळी सणा निमित्त मोफत फराळ वस्तूंचे वाटप करण्यात आले. पेशवे गणपती मंदिर शिवाजी रस्ता कसबा पेठ येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी कसबा पेठ पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक भीमराव मांजरे, व त्यांचे सहकारी मेजर होळकर, ज्ञानदीप सोशल फाऊंडेशनचे यादव पुजारी, निलेश बोधे,मनोज परमार,रोहित बोधे, गणेश नगरकर, सचिन किवडे, सचिन मुंदडा, मंगेश राव, श्री कोकाटे, परेश शहा आदी मान्यवर उपस्थित होते. पेशवे गणपती मंदिर ट्रस्टचे विशेष सहकार्य असून दरवर्षी हा उपक्रम बाबविण्यात येतो. आभार प्रदर्शन निलेश बोधे यांनी केले.
छायाचित्र : फराळ वस्तु वाटप करतांना मान्यवर. .