रोटरी क्लब युवाच्या निर्माल्य खत प्रकल्पाचे मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन.

Share This News

रोटरी क्लब युवाच्या निर्माल्य खत-श्रेडिंग प्रकल्पाचे मा.आ.मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पात गेल्या ५ वर्षात सुमारे ५०० टन निर्माल्याचे श्रेडिंग करून सुमारे २०० टन खत तयार करून शेतकरी व इच्छुक नागरिकांना मोफत देण्यात आले.  डिपी रस्ता कर्वे नगर येथे ज्ञानदा शाळेसमोर झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मा.नगरसेवक जयंत भावे, रोटरी क्लब युवाचे अध्यक्ष सत्यजित निगडे, सचिव गोपाल निर्मल, प्रकल्प प्रमुख मनोज धारप, महानगरपालिका सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक गणेश खिरीड, श्रीकांत जोशी, गौरी शिकारपुर, सतीश खाडे, नितिन मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मेघाताई कुलकर्णी यांनी या प्रकल्पातील सातत्य व त्याला दरवर्षी मिळत असलेला वाढता प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे संगितले.  

छायाचित्र : उद्घाटन प्रसंगी मान्यवर.