अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय कलामंच आयोजित १७ व १८ मे ला पुणे शहरात प्रतिभा संगम राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. याची सुरुवात १७ मे ला सकाळी ८:४५ वाजता ग्रंथ दिंडी पासून झाली.
साहित्यामध्ये ग्रंथाचे सर्वात महत्वाचे स्थान आहे. यामुळे, प्रतिभा संगम या विद्यार्थी साहित्य संमेलनाची सुरूवात ही ग्रंथ दिंडी पासूनच केली जाते. आज सकाळी ८:४५ वाजता गजानन महाराज मठ, पर्वती या ठिकाणी या ग्रंथ दिंडी चे उद्घाटन शाहीर हेमंत राजे मावळे यांच्या हस्ते झाले. तसेच, प्रमुख उपस्थिती नोंदविलेले ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे व इतर मान्यवरांच्या हस्ते भगवद्गीता, ज्ञानेश्वर, दासबोध आणि संविधान या ग्रंथाची पुजा करून,व पालखी समोर श्रीफळ फोडून ग्रंथदिंडी ची सुरुवात झाली. मार्गाने स्थानिक नागरिकांनी या ग्रंथ दिंडी चे धुमधडाक्यात स्वागत केले. ०९:३० च्या सुमारास या ग्रंथ दिंडी चा पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात पोहचली व ग्रंथदिंडीचा समारोप करण्यात आला.
यावेळी, अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य डॉ. प्रशांत साठे सर, १९ वे राज्यस्तरीय प्रतिभा संगम स्वागत समितीचे अध्यक्ष प्रदीप दादा रावत,स्वागत समिती सचिव डॉ. श्रीपाद ढेकणे सर, निमंत्रक डॉ. सुनील कुलकर्णी सर, अभाविप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री अभिजीत दादा पाटील, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री अनिल दादा ठोंबरे, पुणे महानगर अध्यक्ष प्रा. शरद गोस्वामी सर, पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल व इतर विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.
*शुभंकर बाचल 97646 94305*
*पुणे महानगर मंत्री, अभाविप*
*व्यवस्था प्रमुख, प्रतिभा संगम*