पुणे, १६मे २०२२ :
प्रतिभा संगम च्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय कलामंच मागील २५ वर्षांपासून विद्यार्थी साहित्यिकांना एक मंच उपलब्ध करून देत आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर यात खंड पडला, मात्र आता सर्वकाही पूर्वपदावर आल्याने यावर्षी पुन्हा प्रतिभा संगम चे आयोजन पुणे नगरीत करण्यात आले आहे.
पुणे मधील पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, पर्वती पायथा या ठिकाणी हे प्रतिभा संगम १७ व १८ मे ला आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी विविध २० गटांची निर्मिती करण्यात आली असून, यात विशेष बाब म्हणजे सर्व गटांच्या प्रमुख विद्यार्थीनी कार्यकर्ती आहेत. पी व्ही जी महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्य सभाग्रह, बॅकड्रॉप, तसेच विविध कक्षांची उभारणी केलेली असून ,या संमेलनात विशेष आकर्षणाचा भाग म्हणून प्रदर्शनी उभारण्यात आलेली आहे.
या २ दिवसीय साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी, प्रदर्शनी, कवी संमेलन, कथाकथन, परिसंवाद, मुलाखत, व सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी साहित्य प्रेमींसाठी आयोजिली आहे, तरी या मेजवानी चा सर्व साहित्य प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष प्रदीप दादा रावत, स्वागत सचिव डॉ. श्रीपाद ढेकणे, निमंत्रक डॉ. सुनील कुलकर्णी यांनी केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून या साहित्य संमेलनात विद्यार्थी साहित्यिक सहभागी होत आहेत. सोबतच, साहित्य क्षेत्रातील नामांकित मंडळी देखील यात उपस्थित राहणार आहेत. साहित्यात रुची असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी आवश्य या संमेलनात उपस्थित राहावे, आणि युवा कर्तुत्वाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगराचे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी केले.
*शुभंकर बाचल 97646 94305*
*पुणे महानगर मंत्री, अभाविप*
*व्यवस्था प्रमुख, प्रतिभा संगम*