विमा प्रतिनिधी गणेश जगताप यांनी हडपसर शाखेत एकाच दिवसात १०० पॉलिसी करण्याचा बहुमान मिळवला.

Share This News

भारतीय आयुर्विमा महामंडळात हडपसर शाखेतील विमा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या गणेश जगताप यांनी एकाच दिवसात १०० पॉलिसी बनविण्याचा बहुमान मिळविला आहे. हडपसर शाखेला इतिहासात प्रथमच हा बहुमान मिळाला आहे. यासाठी त्यांना विकास अधिकारी दीपक वेताळ व शाखाधिकारी ब्रम्हदेव कापसे यांचे मार्गदर्शन लाभले. गणेश जगताप हे गेली २० वर्ष विमा प्रतिंनिधी म्हणून कार्य करीत आहेत. आपल्या या यशात आपल्या सर्व ग्राहकांचे मोलाचे योगदान आहे असे त्यांनी नमूद केले.

छायाचित्र :डावीकडून प्रवीण देशमुख,दीपक वेताळ,शितल जगताप,गणेश जगताप, ब्रम्हदेव कापसे.