ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएनन्ने स्टेशन मास्तरांच्या समस्या सोडवण्यासाठी 31 मे 2022 रोजी संपूर्ण भारतभर एक दिवस सामुहीक रजा आंदोलन करण्याचे ठरविले आहे
संपूर्ण 35000 स्टेशन मास्तर खालील मागण्यासाठी 7 ऑक्टोबर 2020 पासून संघर्ष करत आहेत.
1-43600 रुपयांची नाईट ड्युटी कमाल मर्यादा रद्द करण्याचा आदेश 1 जुलै 2017 पासून वसुलीचे आदेश मागे घेण्यात यावे
२. स्टेशन मास्तरांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात
3. M.A.C.P. जानेवारी 2016 पासून देण्यात यावी
4. स्टेशनमास्टरला सुरक्षा आणि ताण भत्ता देण्यात यावा
5 पद संवर्गाचे वर्गीकरण
6-खाजगीकरण आणि कॉर्पोरिटायझेशन
7. नवीन पेन्शन योजना
बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी
9 डिसेंबर 2020 राजी व्या रेल्वे बोर्डाच्या पत्र क्रमांक 83/ 2020 नुसार 43600 रुपयाच्या नाईट ड्युटी मिळण्या साठी मूळ पगाराची कमाल मर्यादा मोजणे चुकीचे आहे. ते काढून टाकण्यात यावे आणि इतर मागण्यांसाठी भारतातील 35000 स्टेशन मास्तर 31 मे 2022 रोजी सामूहिक रजेवर राहून आंदोलन करतील.
पहिल्या टप्प्यात ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनच्या अधिकार्यांनी रेल्वे बोर्डाच्या अधिका-यांना ई-मेल पाठवून आपला विरोध व्यक्त केला.
दुसऱ्या टप्यात 15 ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतातील स्टेशन मास्टर्सनी रात्रीच्या ड्युटी समयी स्टेशनवर मेणबत्त्या पेटवून निषेध केला.
गटातील आंदोलन सुरळीत ठेवत 20 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत आठवडा काळ्या फिती लावून रेल्वेचे कामकाज केले
31 ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतातील स्टेशन मास्तरांनी एकदिवसीय उपोषण करून रेल्वेचे कामकाज सुरळीत
पाचव्या टप्प्यात भारतातील 35000 स्टेशन मास्टर्स, ड्युटीवर आणि ऑफ ड्युटी प्रत्येक विभागीय कार्यालयात निदर्शने केली
नाईट ड्युटी सीलिंग मर्यादा काढून टाकण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने डीओपीटीला पाठवले असून अद्याप डीओपीटीकडून अर्थसाह्य करण्यात आलेलं नाही. अखिल भारतीय स्टेशन मास्टर असोसिएशन अशा आदेशांना कायदेशीर मार्गाने तीव्र विरोध करते आणि प्रशासनाला इशारा देते की, त्यानंतरही हा आदेश प्रशासनाने मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, त्याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पूर्ण पालन केले जाईल.
धनंजय चंद्रात्रे राष्ट्रीय अध्यक्ष
विश्वजित किर्तिकर विभागीय सचिव
एस के मिश्रा क्षेत्रीय सचिव
अजय सिन्हा कार्याध्यक्ष
दिनेश कांबळे संघटक सचिव