PRESS NOTE
जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी यावर राष्ट्रीय समाज पक्ष भागीदारी करणार
केंद्र आणि राज्य सरकारने मिळूनओबीसी आरक्षणाचा गळा घोटला -काशीनाथ नाना शेवते
पुणे :दि 12 मे :राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ओबीसी आरक्षण व पश्चिम महाराष्ट्र पुणे -पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने पदनियुक्तीचे वाटप आज पत्रकार भवन येथे करण्यात आले
राज्यात सद्यस्थितीत ओबीसी आरक्षण मुद्दा गाजत असताना आरक्षणासंदर्भात राष्ट्रीय समाज पक्ष हा ओबीसी आरक्षण लढा देणार असून आगामी काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकीत 52 टक्के ओबीसी समाजाला उमेदवारी देणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते व मुख्य महासचिव माऊली सलगर यांनी पत्रकार परिषदेत केली
केंद्र सरकार व राज्य सरकार ओबीसी आरक्षण संदर्भात नेहमीच चालढकल करीत असून त्यांच्या नाकर्तेपणामुळे आज ओबीसी आरक्षण मिळाली नसल्याची खंत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली
राष्ट्रीय समाज पक्ष पुणे व पिंपरी-चिंचवड कार्यकारणी व पदाधिकारी यांच्या वतीने पदनियुक्त्या देण्यात आल्या
यामध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने ,जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर ,किरण गोफने जिल्हाध्यक्ष ग्रामीण ,संपर्कप्रमुख अंकुश देवडकर, कार्यकारणी सदस्य बाळासाहेब कोकरे व पदाधिकारी व पुणे व पिंपरी-चिंचवड कार्यकारणी उपस्थित होते