रोटरी क्लब शनिवारवाडाच्या वतीने स्मित फाउंडेशन येथील दिव्यांग मुलामुलींनी मेट्रो सफारीचा आनंद घेतला. वनाज ते गरवारे व परत वनाज अशी मेट्रो सफर केली. या प्रसंगी रोटरी क्लब शनिवारवाडाच्या अध्यक्ष मिराताई भरवीरकर, सचिव संतोष परदेशी, भाजप उद्योग आघाडी पुणे शहर अध्यक्ष अमृताताई देवगावकर, हास्य योगांचे ज्येष्ठ सदस्य, रोटरी सदस्य उपस्थित होते. मेट्रोचे कंट्रोलर आदित्य यांनी विशेष बोगीची व्यवस्था करून दिली. मेट्रो स्टेशन मास्तर यांचा सत्कार करण्यात आला. मेट्रोमध्ये प्रथमच बसलेल्या या मुलांनी या छोटेखानी सफरीचा खूप आनंद लुटला.
छायाचित्र : मेट्रो स्टेशन येथे मान्यवर व मुलेमुली.