मुलांनी केले विक्रम प्रस्थापित.

Share This News

किडस ब्रेन अॅकाडमी पुणे यांनी राष्ट्रीय पातळी वरील अॅबकस व रुबीक क्युब स्पर्धा २०२२ एस.एन.बी.पी हायस्कूल मोरवाडी पिंपरी चिंचवड येथे आयोजित केली होती. या स्पर्धेत पुणे, कर्नाटक, दिल्ली, हैदराबाद येथून २०० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या प्रसंगी वृषाली भोसले (संचालिका एस.ई. सोसायटी पुणे, व जवाहरलाल नेहरू हॉकी टूर्नामेंट (JNHT) सोसायटी भारत उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय वंडर बुक ऑफ रेकॉर्ड भारताचे प्रमुख सल्लागार बिंगी गौडा, तसेच ए ए गंगाधर व नागेश चव्हाण, किड्स ब्रेन अॅकाडमीच्या मुख्य संचालिका  पल्लवी थिटे, आदी मान्यवर उपस्थित होते.

     ए.ए. गंगाधर यांनी खालील विद्यार्थ्यांची पडताळणी करून विक्रम प्रस्थापित करून १)कु.कानिष्क कानवडे वय ८ ,पुणे ब्ल्यु रिज स्कूल. २)मंजिरी थिटे वय ९,पुणे. ३)कु.प्रतिक्षा पटटाण शेट्टी वय १३ कर्नाटक स.ग.क. शहा पब्लिक स्कूल. वरील मुलांना वंडर बुक ऑफ रेकॉर्ड चे सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. तसेच १) कु कुंष  शिरसाठ वय ८ पुणे. २)कु समृद्धी तोलनूर वय ९ कर्नाटक. ३)स्मृती ढगे वय १६ पुणे॰ ४) वैष्णवी पिंपळे वय १५ पुणे   या स्पर्धकांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड यात विक्रम प्रस्थापित केले. पालकांनी व विद्यार्थांनी अॅबकस व वैदीक गणितामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता व कुशाग्र बुद्धी विकसित झाली यावर आपले मनोगत व्यक्त केले.

छायाचित्र : विजेते स्पर्धक व मान्यवर यांचे समूहचित्र.