रोटरी वेस्टएंडच्या वतीने पुणे पोलिसांसाठी हृदयविकार- माहिती व मार्गदर्शन संपन्न.

Share This News

जागतिक आरोग्य दिनानिमित्त अहोरात्र कार्यरत असणार्‍या पोलिसांसाठी हृदयविकार – माहिती व मार्गदर्शन  सी पी आर प्रात्यक्षिकसह संपन्न झाले. पोलीस अधिक्षक कार्यालय ,पुणे ग्रामीण येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब वेस्टएंडचे अध्यक्ष शैलेश नांदूरकर, प्रकल्प समन्वयक आदित्य देवधर, मार्गदर्शन करणारे डॉ.ऋतुपर्ण शिंदे(हृदयविकार तज्ञ),वेस्टएंडचे सचिव राहुल अवस्थी,नितिन वाशीकर, अॅडिशनल एस पी मितेश घट्टे, अॅडिशनल एस पी मिलिंद मोहिते, पी आय अविनाश शिळीमकर, आदी मान्यवरांच्या बरोबरच सुमारे १०० पोलीस उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना जीवनशैलीत योग्य बादल व रूग्णाला त्वरित सी पी आर मिळणे महत्वाचे असे संगितले व सी पी आर चे प्रात्यक्षिक दाखविले. मितेश घट्टे यांनी आपल्या व्यस्त कामात ही शक्य तितके चालणे व योग्य आहारावर भर द्यावा असे संगितले. शैलेश नांदूरकर यांनी पोलिसांनी आपले व्यस्त काम करीत असतानाच आरोग्याची काळजी घ्यावी असे संगितले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.ऋतुपर्ण शिंदे यांनी उपस्थितांच्या प्रश्नाना उत्तरे दिली.

छायाचित्र :सी पी आर प्रात्यक्षिक दाखवताना ऋतुपर्ण शिंदे व उपस्थित पोलीस वर्ग