कोथरुडकरांसाठी आज सोन्याचा दिवस आहे. कारण वर्षोनुवर्षे कर्वे रोड वरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा ही कोथरुडकरांची इच्छा आज पूर्ण होत आहे. नळस्टॉप येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी दुहेरी उड्डाणपुलाचे लोकार्पण भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते केले. यानंतर महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्यासोबत ई-बाईकने प्रवासही केला. यावेळी भाजपाचे कोथरुड मधील नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.