कोव्हीड-१९ च्या काळात सर्व धोके पत्करून नमुने परीक्षण, विषाणू संशोधन, RTPCR टेस्ट कीट चे गुणवत्ता मापन व व्यवस्थापन, लस चाचणी यामध्ये केलेल्या अतुलनीय कामाबद्दल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमधील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांचा रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड तर्फे सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम नुकताच राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पाषाण येथे संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड तर्फे डॉ. प्रिया अब्राहम, संचालक राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांना या वर्षीचा रोटरी गुणवत्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विषाणू विज्ञान या विषयात उल्लेखनीय कामगिरी करणारे शास्त्रज्ञ डॉ. प्रग्या यादव, डॉ. गजानन सपकाळ, डॉ. वर्षा पोतदार यांना ‘रायझिंग स्टार पुरस्काराने’ या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास संगणक तद्न्य डॉ. दीपक शिकारपूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच असिस्टंट गव्हर्नर हेमंत जेरे, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर अजय वाघ, अध्यक्ष सत्यजित चितळे, गायत्री लडकत, वंदना दांडेकर, सुहास पटवर्धन व रोटरी क्लब पुणे कोथरूड यांच्या सदस्यांनी या वेळेस शास्त्रज्ञांशी संवाद साधला व आरोग्यविषयक सेवा प्रकल्पांमध्ये दोन्ही संस्थांच्या सहभागातून विशेष प्रयत्न करण्याचे नियोजन केले.
छायाचित्र डावीकडून गायत्री लडकत,हेमंत जेरे,प्रिया अब्राहम,दीपक शिकारपुर,सत्यजित चितळे.