*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती* चे औचित्य साधून पर्वती विधानसभा मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश करण्यात आला.
*मा.मुकेश मधुकरराव धिवार (प्रदेशाध्यक्ष-राहुल प्रियांका गांधी सेना महाराष्ट्र राज्य)* यांच्या वतीने राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित आघाडी, भाजपा तसेच इतर सामाजिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी *अभिनेत्री माधवी मोरे, दर्पण ठाकूर, सिमा साळुंखे, शाहनाज खान, उध्दव कांबळे, पूनम संजय वाघमारे, अमीन भांडे, दत्ता कोल्हे, विपुल पाटील, राजेश गायकवाड, हर्षल पवार* इत्यादी सेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.
मा.नानाभाऊ पटोले यांनी विश्वास दिला की सर्व तरुण कार्यकर्त्यांना येणाऱ्या पुणे महानगरपालिका 2022 मध्ये तरुणांना संधी देण्यात येईल. तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल.
तसेच काँग्रेस पक्षाच्या विचारधारेच्या विविध संघटना असतील, त्यांनाही काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात घेण्यात येईल तसेच त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल.
*नाना भाऊंनी जाते वेळी मुकेश धिवार यांना सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसेच मी पुर्ण ताकदीने मुकेश तुज्या पाठीशी नाही तर सोबत आहे. तू फक्त लढ..!*