शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी सरकार व नागरिक यातील दुवा बनून शिवसेना पक्ष आणि सरकारने केलेले काम घरोघरी पोचवावे. तसेच आपआपल्या मतदार संघात शिवसेना उमेदवार विजयी होतील यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती ना. डॉ.नीलमताई गो-हे यांनी केले. त्या महिला सक्षमीकरणासाठी आयोजित “प्रथम ती” या शिबिरात मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कोथरूड मधील अंबर हॉल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना उपनेत्या मीना कांबळी, महिला संपर्क संघटक तृष्णा विश्वासराव, नगरसेविका संगीता ठोसर, पल्लवी जावळे ,सविता मते, कल्पना थोरवे, प्राची आल्हाट, शिवसेना उपनेते शशिकांत सुतार, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, मनपा गटनेते पृथ्वीराज सुतार, युवासेना सहसचिव किरण साळी, मा.आ.चंद्र्कांत मोकाटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र खेबुडकर, सूरज ढाबरे, समाज विकास विभागाच्या पुजा पवार, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, आदी मान्यवर व महिलावर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमात पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. या शिबिरात महिलांना जिल्हा उद्योग केंद्र देत असलेल्या सुविधा व महिलांच्या बाबतीत कायदेशीर तरतुदी यांची माहिती देण्यात आली. शशिकांत सुतार यांनी बोलतांना सर्व सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवायच्या हे काम सर्वांनी चिकाटीने केले पाहिजे असे संगितले. तृष्णा विश्वासराव यांनी बोलतांना १९९२ मध्ये आपल्याला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सभागृह नेते म्हणून काम करण्याची संधी दिल्याचे संगितले. मीना कांबळी यांनी गटप्रमुख हा महत्वाचा घटक असून महिलांनी पद घेतल्यावर साजेसे काम केले पाहिजे असे प्रतिपादन केले. पल्लवी जावळे यांनी सर्व सामान्य जनतेसाठी काम केल्यास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो असे संगितले.
छायाचित्र :मार्गदर्शन करताना नीलमताई गो-हे,संजय मोरे,तृष्णा विश्वासराव,मीना कांबळी,शशिकांत सुतार,गजानन थरकुडे आदी