रोटरी प्रांतच्यावतीने रंगभूमी पडद्या मागील कलाकारांचा सत्कार संपन्न.

Share This News

रंगभूमी- नाट्य क्षेत्रांत पडद्या मागील कलाकार म्हणजे प्रकाश,ध्वनी,सेट ई कामे करणार्‍या कलाकारांचा सत्कार रोटरी प्रांत ३१३१ च्या व्होकेशनल विभागाच्या वतीने करण्यात आला. १५ रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन भरत नाट्य मंदिर येथे करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल पंकज शहा,प्रिया शहा, रोटरी प्रांत व्होकेशनल डायरेक्टर अजय वाघ, प्रमुख पाहुणे माधव अभ्यंकर( रात्रीस खेळ चाले फेम), व रविंद्र खरे(भरत नाट्य मंदिर), संजय डोळे(अध्यक्ष रोटरी हिलसाईड), हेमंत पुराणिक(रोटरी क्लब विज्डम ),रविंद्र पाटील(अध्यक्ष रोटरी क्लब लोकमान्य नगर), कल्चरल कमिटीच्या पुजा गिरी आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. मानपत्र असे सत्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी बोलतांना पंकज शहा यांनी रोटरी आपल्या क्षेत्रांत उत्तम कार्य करणार्‍यांचा सत्कार करते असे संगितले. रविंद्र खरे यांनी नाट्य हे मानसासारखे एक जिनसी असते, कलाकार व पडद्या मागील कलाकार हे एकाच शरीराचे दोन अवयव आहेत असे संगितले. तसेच रंगभूमी सेवक संघास २५०००/-रु पंचवीस हजार देणगी दिली. अजय वाघ यांनी बोलतांना समजतील सर्वच स्तरांत उत्तम काम करणार्‍या व्यक्तींचा सत्कार ही समाजाची गरज असल्याचे संगितले. सत्काराला उत्तर देताना कर्मचारी सुधीर फडतरे यांनी कोरोना काळात सामाजिक संस्थांनी मदत करून कामगारांना जगविले असे संगितले. या कार्यक्रमात रंगभूमी सेवक संघाने “आत्म्याला मुक्ती मिळालीच पाहिजे” ही एकांकिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय जबडे यांनी केले. तर संजय डोळे यांनी आभार मानले.

छायाचित्र :सत्कारीत कर्मचारी व मान्यवर यांचे समूह चित्र