रोटरी प्रांत ३१३१च्या व्होकेशनल टिमच्या वतीने पुणे स्टेशन येथील लायसेन्सी पोर्टरांचा सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ,श्रीफळ व भेटवस्तू असे सत्काराचे स्वरूप होते. पुणे रेल्वेस्टेशन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांत ३१३१चे प्रांतपाल रो.पंकज शहा, रो.अॅड. अजय वाघ(व्होकेशनल डायरेक्टर), मुख्य कार्यकारी अधिकारी मोहनराव दुधाने, स्टेशन डायरेक्टर सुरेशचंद्र जैन,सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार, मुख्य वाणिज्य निरीक्षक मुरली अय्यर,रो.रवींद्र पाटील(अध्यक्ष रोटरी क्लब लोकमान्यनगर),असित शहा(अध्यक्ष रोटरी क्लब फोर्च्युन),सचिन शहा(अध्यक्ष रोटरी क्लब कॅम्प),रो.विकास छाजेड(अध्यक्ष रोटरी क्लब सिनर्जी),रो.पवन जोशी(अध्यक्ष रोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंड),रो.पुष्कराज मुळे(अध्यक्ष रोटरी क्लब कात्रज),सिमरण जेठवाणी(अध्यक्ष रोटरी क्लब सनराईज),रो.दीपक तोष्णीवाल(माजी अध्यक्ष रोटरी फोरच्यून).रो.विलास रवांदे(माजी अध्यक्ष रोटरी क्लब लोकमान्यनगर)आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य व लायसेन्सी पोर्टर (कुली) उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना प्रांतपाल पंकज शहा यांनी रोटरी विविध क्षेत्रांत काम करते यात विविध क्षेत्रांत काम करणार्या व्यक्तींचे सत्कार करण्यात येतात. लायसेन्सी पोर्टर(कुली) हे देखील उत्तम कार्य करीत असतात त्याची पावती म्हणून हा सत्कार करण्यात येत आहे असे संगितले. रो.अॅ.अजय वाघ यांनी आगामी काळात सुद्धा अशा प्रकारे काम करणार्या अन्य व्यक्तींचा सत्कार करण्यात येईल असे संगितले.
छायाचित्र :मान्यवर आणि सत्कारीत यांचे समूहचित्र