जैन धर्माचे २३ वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांच्या जन्मकल्याणक निमित्त श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथे प.पू.गच्छाधिपती श्री. विज्ञानप्रभूसूरीश्वरजी महाराज यांचे शिष्य पुनीतप्रभ, व साध्वी अरिहंतप्रभाजी महाराज यांच्या सानिध्यात पोषदशमी अठ्ठम तपाची सुरुवात करण्यात आली. अभिषेक करण्यात आला. आणि सुंदर देखावा तयार करण्यात आला. या प्रसंगी लाभार्थी सौ.प्राचीबेन श्रेणिकभाई बलई परिवार,भरतभाई शहा, अशोकभाई शहा, धिरूभाई शहा,सुधीरभाई शहा, चिराग दोशी,भुपेंद्रभाई शहा, राजीवभाई शहा आदी मान्यवरांच्या बरोबरच भाविक उपस्थित होते. जैन धर्माचे २३ वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांच्या जन्मकल्याणक व दीक्षा निमित्त जगभरातील लाखो भाविक या वेळी अठ्ठम तप करतात असे राजीव शहा यांनी नमूद केले.
छायाचित्र : जन्मकल्याणक निमित्त तयार केलेला सुंदर देखावा.