रोटरीच्या डिस्ट्रिक्ट व्होकेशनल कमिटीच्यावतीने क्रीडाक्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणार्या मान्यवरांचा सत्कार.

Share This News

रोटरी क्लबच्यावतीने विविध क्रीडा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणार्‍या मान्यवरांचा सत्कार रोटरी क्लब लोकमान्यनगर, रोटरी क्लब विजडम, रोटरी क्लब मिड ईस्ट, रोटरी क्लब सन राईज व सखाराम मोरे क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. डेक्कन जिमखाना येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी चीफ गेस्ट माजी प्रांतपाल  रो.डॉ.दीपक शिकारपूर, गेस्ट ऑफ ऑनर शांताराम जाधव, रो.अॅड.अजय वाघ (डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर), रो.रवींद्र पाटील(अध्यक्ष रोटरी क्लब लोकमान्यनगर), रो.हेमंत पुराणिक(अध्यक्ष रोटरी क्लब विसडम), रो कृष्णा सिंगार(अध्यक्ष रोटरी क्लब मिड ईस्ट), रो.गौरी शिकारपूर(युथ डायरेक्टर).क्रांती शहा (पब्लिक इमेज डायरेक्टर),रो.सिमरण जेठवाणी(अध्यक्ष रोटरी क्लब सनराईज),रो.सुधीर काकडे(डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स डायरेक्टर),शेखर सावदेकर,आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कारीत मान्यवर पुढील प्रमाणे – मोहन साठे (व्हॅलीबॉल), नरेंद्र हसबनीस(व्हॅलीबॉल), मिलिंद कुलकर्णी(फुटबॉल), जयवंत बोडके(कबड्डी), राजेंद्र मिसळ(सॉफ्टबॉल), शेखर पुजारी (बॉक्सिंग), स्नेहल गेरडे(गिर्यारोहण), सत्काराचे स्वरूप शाल,श्रीफल पुष्पगुच्छ,प्रमाणपत्र आणि टिशर्ट असे होते. या प्रसंगी बोलतांना दीपक शिकारपूर यांनी खेळ हे मैदानातच खेळून आनंद घेतला पाहिजे, मोबाईलवर खेळ खेळणे भयंकर आहे.सर्वच खेळ मोबाईलवर खेळत राहिल्यास शारीरिक क्षमतेची हानी होईल असे प्रतिपादन केले. अजय वाघ यांनी क्रीडा क्षेत्रांत अतुलनीय कार्य करणारे खरे हीरो आहेत दिखावू पडद्यावरच्या हीरो पेक्षा तरुणांनी खेळाडूंना हीरो मानून त्यांचे अनुकरण करावे असे संगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद बावा यांनी केले.    

छायाचित्र : सत्कारार्थी व मान्यवर.