विधान परीषदेत शक्ती विधेयक एकमताने मंजूर झाले आहे.
– या विधेयकामुळे स्त्रियांना नक्कीच न्याय मिळेल.
– महिला सुरक्षा विषयक कायदा मी उपसभापती म्हणून पास करता आले.याबद्दल आनंद आहे.
– कायदेविषयक इच्छाशक्ती एकवटली तर कायदा लवकरच पास होईल.
– शक्ती विधेयक निर्माण करून ते मंजूर करून घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आभार डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी विधयेक मंजूर झाल्यानंतर आभार मानले.
– महाराष्ट्रातील महिलांच्या विकांसाच्या संदर्भात, न्यायाच्या संदर्भात हे शिवधनुष्य सर्वांनी उचले पाहिजे तरच महिलांच्या विकासाचे इंद्रधनुष्य दिसू शकेल असे देखील मत डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केले.
– दिलीप वळसे पाटील कार्यक्षम गृहमत्री आहे ते सुद्धा प्रयत्न करतील त्याच प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी देखील केंद्रातून कायदा पास होण्यासाठी सहकार्य करावं