) *”रोटरी युवा बॉक्स क्रिकेट लीग”* रोटरी क्लब युवा आयोजित रोटरी युवा बॉक्स क्रिकेट लीगमध्ये रोटरी क्लब सिनर्जी संघाने RCP मिक्स संघाचा पराभव केला. चुरशीच्या या लढतीमध्ये RCP मिक्स ने प्रथम फलंदाजी करत ४ बाद ५९ धावा केल्या. प्रत्युत्तर देताना रोटरी क्लब सिनर्जीने ४.२ओव्हरमध्ये ६० धावा करून सामना जिंकला. “सामनावीर” हा मान अमित शहा ह्याने पटकाविला. दिनांक १८ व १९ डिसेंबर २०२१ रोजी कर्वेनगर येथील डर्बी स्पोर्ट्स येथे हे सामने खेळले गेले. दोन दिवसीय सामन्यांमध्ये रोटरी क्लब बावधन इलाईट, रोटरी क्लब रॉयल, इन्स्पिरेशन, रोटरी क्लब विसडम, रोटरी क्लब प्रिस्टिन, रोटरी क्लब पाषाण, रोटरी क्लब मिक्स, रोटरी क्लब फिनिक्स, आरसीपी रोटरी क्लब सिनर्जी, रोटरी क्लब गांधीभवन, रोटरी क्लब साऊथ, रोटरी क्लब कर्वेनगर व रोटरी क्लब कॅन्टोन्मेंट अशा बारा संघांचा सहभाग होता. प्रत्येक संघामध्ये एक महिला खेळाडूसह सात खेळाडूंचा समावेश होता. प्रत्येक सामन्याअंतर्गत उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, लढवय्या खेळाडू व उत्कृष्ट महिला खेळाडू अशी पाच बक्षिसे देण्यात आली. विजेत्या संघाला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपविजेत्या संघालाही ढाल देण्यात आली. याशिवाय लीगमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू, फलंदाज, गोलंदाज व महिला खेळाडूंना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेदरम्यान महिला खेळाडूंचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. रोटरी युवा बॉक्स क्रिकेट लीग मधील रंगतदार झालेल्या स्पर्धेचे उदघाटन रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल पंकज शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी शीतल शाह, एजी शिरीष पुराणिक, मिलिंद अग्निहोत्री, शकुर सय्यद व अध्यक्ष तृप्ती नानल व सचिव दीपा बडवे हे मान्यवर उपस्थित होते. बक्षीस समारंभ डिजीएनडी रो. शीतल शाह ह्यांच्या उपस्थित संपन्न झाला रोटरीक्लब युवाचे सदस्य रो.गोपाळ निर्मल व रो. बहार बडवे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली या लीगचे आयोजन करण्यात आले. क्लबचे सदस्य रो. सुनील हरपळे यांचे विशेष सहकार्य लाभले. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून या सर्व स्पर्धा संपन्न झाल्या.
छायाचित्र :विजेता संघ व मान्यवर यांचे समूह चित्र