रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वतीच्या वतीने डॉ.दीपक कुमार यांचे वास्तुशास्त्र विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. रुईया मुक बधिर विद्यालय येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब पार्वतीचे अध्यक्ष रो.शेखर लोणकर, सेक्रेटरी रो.अमर कोटबागी, आदी मान्यवरांच्या बरोबरच क्लबचे सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉ. दीपक कुमार यांनी आपण स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरतो, शेतीच्या सुरक्षेसाठी खत वापरतो मात्र आपले जीवन ज्या वास्तूत(घरात) व्यतीत करणार आहोत त्याच्या सुरक्षितते साठी काय करतो ?,आपण ज्याप्रमाणे आपल्या वार्षिक उत्पन्नाचा हिशेब सी.ए कडून करवून घेतो, मात्र आपल्या कोट्यावधीच्या स्थावर संपत्तीचे परीक्षण त्यात काही दोष आहेत का हे वास्तुशास्त्र नुसार तपासतो का ?. म्हणजेच त्यातील वास्तुदोष समजणे व ते निवारण करणे यासाठी आपल्याला वास्तुशास्त्र मार्गदर्शन करते,यामुळे आपल्या संपत्तीत वाढ होते.”. असे प्रतिपादन केले.व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
छायाचित्र : मार्गदर्शन करताना दीपक कुमार