*निर्भयतेने स्त्रियांना जगण्यासाठी आत्ताच जग केशरी बनवूया !* *महिलांविरोधी हिंसाचार प्रतिबंधक पंधरवड्यात यूएनचे आवाहन! डॉ. नीलम गोऱ्हे* *केशरी दिनानिमित्ताने स्त्री आधार केंद्राच्या वतीने दि.२६ नोव्हेंबर पासून ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन…*

Share This News

मुंबई / पुणे दि. २५ : कोव्हिडं -१९ च्या कालावधीत निदर्शनास आल्याप्रमाणे संकटाच्या काळात, वातावरण बदलामुळे आरोग्य नैसर्गिक आपत्ती, युद्धे, मानव निर्मित संकटे यामध्ये अत्याचाराला सामोरे जावे लागलेल्या महिलांची संख्या वाढलेली दिसते की जगभर तीन पैकी १ स्त्रिला तरी आयुष्यात कधी ना कधी शारीरिक छळाला सामोरे जावे लागते. युएनच्या १३ देशांच्या कोव्हीडनंतरच्या अहवालातून समोर आले की  कोणत्या ना कोणत्या हिंसाचाराला सामोरे जावे  लागण्यासोबत महिला अन्न असुरक्षिततेची भावना जाणवण्याइतके  प्रमाण तिनातील दोन असे मोठे आहे. जगातील या प्रातिनिधिक अभ्यासात दिसले की  सरासरी १० पैकी एकाच स्त्रीने हिंसाचार विरोधात पोलीस स्टेशनच्या अत्याचाराचा उल्लेख केला.
*या साठी तुम्ही आम्ही काय करू शकतो?*
१. पीडितांच्या कैफियतींवर विश्वास ठेवा.
२. हिंसाचाराच्या मुळाशी असणाऱ्या विचारांची बीजे समजून त्यावर भूमिका व कार्यप्रणाली ठरावा.
३. अन्यायकारक सामाजिक प्रथांत परिवर्तन करा.
४. महिला व मुलींचे सक्षमीकरण करा.

या चार कृतीसोबतच पोलीसांचे कार्यपद्धतीत पिडितांना केंद्रबिंदू ठेऊन न्याय, आरोग्य व सामाजिक तथा पोलिसांच्या मदतसेवा व महिला अधिकारांच्या कार्यक्रमास आर्थिक मदत, यातून महिला विरोधी हिंसाचार थांबवता येऊ शकेल.

या मोहिमेसाठी उगवतीचा आशादायक रंग म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने भगवा रंग निवडला आहे व त्याचेच नाव मोहिमेस दिले आहे. ‘Orange The World : End Violence against women now ! म्हणजेच स्त्रियांना निर्भयतेने जगण्यासाठी आताच जग केशरी बनवू या! महिला हिंसाचार प्रतिबंधासाठी यूएनने आवाहन करून #Generation Equality
#Orange the World
#16 Degs
#Spreadthe world
या हॅशटॅगने मोहीम चालविण्याची विनंती केली आहे.

२००८ पासून संयुक्त राष्ट्र संघ व यूएन विमेन ही मोहीम २५ नोव्हेंबर पासून सुरू केली असून १० डिसेंबर २१पर्यंत महिला व बालिकांविरोधातील हिंसाचार प्रतिकार व अत्याचार निर्मूलन व्हावे यासाठी वैश्विक स्तरावर जागृती, या प्रशासनास  समर्थन, आव्हाने व उपाययोजना यावर कृतीस चालना देत आहे.

*यूएनने २४ नोव्हेंबर २१ ला तेथील वेळानुसार याविषयाचा अधिकृत शुभारंभ केला त्याची लिंक व व्हिडिओ*
डॉ.नीलम गोऱ्हे अध्यक्ष स्त्री आधार केंद्र, उपसभापती महाराष्ट्र विधानपरिषद व शिवसेना उपनेत्या यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट @neelmagorhe तसेच स्त्री आधार केंद्राच्या @स्त्री आधार केंद्र या फेसबुक अकाऊंटवर जोडून घेण्यात आला आहे.

*स्त्री आधार केंद्राने २६ नोव्हेंबर शुक्रवारी दुपारी ३ ते ५ @स्त्री आधार केंद्र या फेसबुकच्या तसेच ४, १० डिसेंबरलाही ऑनलाईन परिसंवादावर ठेऊन पीडितींचे अनुभव, त्यासाठी संस्थेने केलेल्या कार्यक्रमाचा आढावा, पोलीस अधिकाऱ्यांचे अनुभव यावर कार्यक्रम आयोजित केले आहेत. मोहिमेचा समोरोप १० डिसेंबर ला ना.डॉ.नीलम गोऱ्हे करणार आहेत.*

या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, सचिव अपर्णा पाठक, रमेश शेलार, आश्लेषा खंडागळे, विभावरी कांबळे, अनिता शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.