मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने …………. राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा -पर्व ३ नावनोंदणीस राज्यभर प्रारंभ ……. गणिताच्या प्रतिभेला वाव देण्याचा उपक्रम कौतुकास्पद : सुभाष देसाई

Share This News

पुणे :

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्याना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने मॅप एपिक कम्युनिकेशन्स् प्रा लि आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पाढे पाठांतर , सात्मीकरण स्पर्धा -पर्व ३ आयोजित करण्यात आली आहे.

नावनोंदणीस राज्यभर आठ नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला असून १५ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. पाढ्यांचे व्हीडीओ २५ नोव्हेंबर पासून ३१ डिसेंबर पर्यंत अपलोड करता येणार आहेत. त्यासंबंधी माहिती अंक नाद संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र राज्य शासनाने मराठी विकास संस्थामार्फत सह आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनांत सहभाग घेतला आहे.

मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार नामजोशी , समीर बापट यांनी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन स्पर्धच्या तिसऱ्या पर्वाची माहिती दिली. ‘

गणितासारख्या अवघड विषयाची गोडी लावण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे.विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला जो वाव या स्पर्धच्या माध्यमातून दिला जात आहे, तो कौतुकास्पद आहे, असे उद्गार सुभाष देसाई यांनी यावेळी बोलताना काढले.

मंदार नामजोशी म्हणाले,’ अंक नाद पाढे पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल. अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून पाठ होतात. त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनाद तर्फे पाढे पाठांतर, सात्मीकरण स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचे आयोजन केले आहे.

सर्व सहभागी विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रत्येक गटात राज्य पातळीवर विजेत्यांना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र बक्षीस म्हणून दिली जाणार आहेत.

ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यासाठी अंकनाद अॅपद्वारे फॉर्म भरुन आपल्या जिल्ह्यासाठी नोंदणी करु शकतील .

https://bit.ly/2Po2CI4 या लिंकवरुन अॅप द्वारे माहिती मिळू शकेल. स्पर्धेचा तपशील
http://www.mahaaanknaad.com या संकेतस्थळावर देण्यात आला आहे.