२१७ जुनाबाजार येथील ४ इंची पाणीपुरवठा पाईप व सिमेंटीकरण कामाचे माजी स्थायी समिति अध्यक्ष सदानंद शेट्टी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी नगरसेविका सुजाताताई शेट्टी, शहनाज शेख, बानूबी शेख, अब्दुल भोलावाले, रेशमा शेख, अमिना ढवळगी, गफार शेख, राजू भाई, सलामभाई शेख, समीर शेख आदी मान्यवरांच्या बरोबरच स्थानिक नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना सदानंद शेट्टी यांनी पाणी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो,कोरोना काळात कामे थांबली होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नमूद केले.
छायाचित्र : भूमिपूजन प्रसंगी सदानंद शेट्टी,सुजाताताई शेट्टी,व नागरिक.