“दिवाळी हा प्रकाशाचा व आनंदाचा सण आहे. सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचा पुना मर्चन्ट चेंबरचा रास्त भावात लाडू चिवडा उपक्रम स्तुत्य आहे. सर्व सामन्यांची व शिवसेनेची ही दिवाळी यंदा गोड झाली आहे कारण दादरा नगर हवेली येथे शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. तसेच नांदेड देगलूर येथे कॉग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. याबद्दल जनतेचे आभार” असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलमताई गो-हे यांनी केले. पुना मर्चन्ट चेंबरच्या रास्त दरात लाडू चिवडा विक्री केंद्राच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी बोलताना पुना मर्चन्ट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी या वर्षी पावणेदोन लाख किलो लाडू व तितकाच चिवडा १४४ रु इतक्या रास्त भावात विकण्यात आला. या वर्षी ग्राहकांचा प्रतिसादही वाढला असे संगितले. वर्धमान महावीर जैन स्थानक बिबवेवाडी येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, गणेश ओसवाल(महामंत्री वर्धमान महावीर जैन स्थानक), माणिकचंद दुगड(उपाध्यक्ष), रमेशलाल गुगळे(उपाध्यक्ष), रामलाल सांचेती (सदस्य), सुनील बलाई (सदस्य), पप्पू महाराज (आचारी), अमोल रासकर(शिवसेना पार्वती विभाग प्रमुख).आदी मान्यवर उपस्थित होते.
छायाचित्र :नीलमताई गो-हे पोपटलाल ओस्तवाल व अन्य मान्यवर.