पुणे दि. २१ : औरंगाबाद जिल्ह्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. मध्यरात्री पैठण तालुक्यातील तोंडीळी गावात दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने वस्तीवर हल्ला केला. त्यावेळी या नराधमांनी दोन महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पोलीस उपअधीक्षक श्री विशाल नेहुल यांच्याशी संपर्क करून सविस्तर माहिती घेतली. तसेच याघटनेतील आरोपींना त्वरित अटक करण्यासाठी पथक तयार करावे. त्याचप्रमाणे याच परिसराच्या जवळच्या जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी अशाच घटना घडल्या होत्या काल दि.१९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडलेल्या घटनेच काही संबध आहे का याची देखील माहिती घेण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी केली आहे. तसेच महिलांचे व त्या कुटुंबाचे समुपदेशन तात्काळ करावे अशी देखील सूचना डॉ.गोऱ्हे यांनी दिली आहे. तसेच या घटनेतील आरोपी पूर्वीच्या घटनेतील संबंधित आहेत का ? किंवा पूर्वीच्या कोणत्या घटनेतील आरोपी या घटनेत आहेत का?याचा देखील तपास घेण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी पोलिसांना केली आहे.
यात काही पोलीस प्रशासन योग्यती पावले उचलत असल्याचे श्री नेहुल यांनी डॉ.गोऱ्हे यांना सांगितले. तसेच लवकरच आरोपीना अटक करण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले.
तसेच पारनेर, नगर येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. याबाबत देखील डॉ.गोऱ्हे यांनी नगर पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील यांना दूरध्वनी वरून संपर्क करून आरोपींना त्वरित अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.