*आरोग्य कर्मचारी हे UNSEEN Heros- ना.डॉ. नीलम गोऱ्हे* *महाविकास आघाडी पिंपरी-चिंचवड यांच्यावतीने कोविड योद्धा, शौर्य, पत्रकारीता पुरस्काराचे वितरण*

Share This News

पुणे/ पिंपरी चिंचवड: महाराष्ट्रात कोरोना वाढला कारण माहाराष्ट्रातील सरकार, प्रशासन, आरोग्य विभाग व नागरिक स्वतःच्या जबाबदारीने काम करत होते. इतर राज्यांप्रमाणे कोरोना चाचण्याच न करणे हा चुकीचा उपाय येथे झाला नाही. अशा महायुद्धाच्या काळात आपण सर्वांनी मिळून केलेले काम कौतुकास्पद आहे. माणूस जगला पाहिजे यासाठी आरोग्य सेवा, मोफत रुग्णवाहिका, मास्क, सॅनिटाइजर, अन्नधान्य वाटप, आदि अनेक कार्यासोबत रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मनोबल वाढवून धीर देण्याचे काम ज्या योद्धांनी केले त्या सर्वांच्या प्रती ना.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

महाविकास आघाडी पिंपरी-चिंचवड यांच्यावतीने आजोजित कोविड योद्धा, शौर्य, पत्रकारीता पुरस्कार तसेच कोरोनाच्या परिस्थितीत समाजसेवा केलेल्या सेवकांचा कृतज्ञता पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांचा हस्ते आज सोमवारी करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. पिंपरी-चिंचवड येथील वाय.सी.एम हॅास्पिटलच्या चाणक्य सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी डॉ. उल्हास जगताप (अतिरिक्त आयुक्त व नगरसचिव, पिं. चिं. मनपा), राजेंद्र बाबळे (डीन, वाय.सी.एम हॅास्पिटल), सचीन भोसले (शिवसेना पिं.चिं.शहरप्रमुख), सजोग वाघीरे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस, पिं.चिं. शहर प्रमुख), कैलास कदम (काँग्रेस, पिं.चिं. शहर अध्यक्ष), उर्मिला काळभोर (महिला आघाडी, शहरप्रमुख), अभय भोर, महादेव गव्हाणे, उमेश चांदगुडे, अशोक वाळके आदी मान्यवर, व पुरस्कार्थी उपस्थित होते. तर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दिलीप (मामा) सावंत (शिवसेना भोसरी), इरफानभाई  सय्यद (उपाध्यक्ष, भा. कामगार सेना), अजित गव्हाणे (नगरसेवक), संदीप पवळे (उद्योजक), शशिकांत देसाई (उद्योजक) यांच्या वतीने करण्यात आले होते.

*डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या,* कोरोना मुक्त गावांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील दहा जिल्हांचा दौरा जेव्हा केला तेव्हा गावातील अनेक नागरिकांनी त्यांचे रहस्य सांगितले. त्यात महत्वाचे म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी सतत होत असलेला  संवादात सांगितले सुजावांचे पालन केल्याने कोरोना मुक्त गाव ठेवू शकलो असे त्यांनी आम्हाला सांगितल. मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये काल कोरोनाने एकही मृत्यू झाला नाही. लवकरच राज्यात देखील अशी स्थिती निर्माण होईल अशी अपेक्षा गोऱ्हे यांनी व्यक्त केली.