महाराष्ट्रीयन उद्योजकांची मांदियाळी असणाऱ्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा “भिडे पूल” हा अनोखा उद्योजकांच्या भेटीचा कार्यक्रम दि. २३ सप्टेंबर २०२१ रोजी, हॉटेल प्राईड येथे दिमाखात साजरा झाला. चार चार उद्योजकांच्या एक एक तासाच्या गोल मेज बैठकांच्या चार फेऱ्यांच्या स्वरूपात, १५० हून अधिक उद्योजकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या छोट्या बैठकांच्या निमित्ताने उद्योजकांनी एकमेकांच्या व्यवसायासाठी अनुकूल संदर्भ तर दिलेच, पण त्याही पुढे जाऊन अनेक उद्योजकांनी एकत्रित येऊन उद्योग करण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर २०२१ पर्यंतच्या आगामी सणासुदीच्या, आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या व्यावसायिक उलाढालीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील उद्योजकांना अधिकाधिक व्यावसायिक संधी उपलब्ध होण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध मुलाखतकार श्री सुधीर गाडगीळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या शिदोरी तील एक एका किस्स्याच्या माध्यमातून व्यावसायिकांनी जपण्याचे व्यावहारिक भान उलगडून दाखवले. या कार्यक्रमास सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष श्री अशोकजी दुगाडे, डेप्युटी सेक्रेटरी जनरल श्री हर्षवर्धन भुरके, पुणे सिटी रिजन चे प्रमुख श्री सुहास फडणीस, सन्माननीय अतिथी श्री किशोर सरपोतदार, एम टी डी सी चे श्री दीपक हरणे तसेच क्लबचे १५० उद्योजक सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्री गणेश चव्हाण (अध्यक्ष पुणे चॅप्टर), श्री सचिन गोखले (अध्यक्ष शनिवार वाडा चॅप्टर) यांनी तर सूत्र संचालन सौ वैशाली वर्णेकर यांनी केले