अनंत चतुर्दशीला श्री गणेशाचे प्रस्थान होते. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे गेली २५ वर्ष गणेश स्थापना होत आहे. आज येथील श्री गणेशाची विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या प्रसंगी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस डॉ.सुजीत तांबडे, चिटणीस प्रसाद पाठक, खजिनदार नीलेश राऊत, कार्यकारिणी सदस्य अस्मिता चितळे, चंद्र्कांत फुंदे, नवनाथ शिंदे, शिवसेना पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, अशोक हरणावळ, राजेंद्र शिंदे, युवासेनेचे किरण साळी, सुदर्शना त्रिगुणाईत, बाळासाहेब मालुसरे, युवराज पारिख आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना ना.नीलम गो-हे म्हणल्या “पुणे तेथे काय उणे म्हणतात मात्र पुणे तेथे कोरोना उणे व्हावा अशी मी गणेश चरणी प्रार्थना करते,आगामी काही दिवसात विविध सण व व्रत वैकल्ये येत आहेत.मात्र याचा आनंद नागरिकांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या कोरोना विषयक निर्देशाप्रमाणे केल्यास पुढील सर्व सण आनंदाने साजरे करता येतील असे संगितले”.
छायाचित्र :आरती प्रसंगी नीलमताई गो-हे,मंगेश कोळपकर व मान्यवर.