“कोरोना महामारीच्या काळात अतुलनीय कामगिरी करणार्या आशा सेविकांना त्यांच्या सुविधेसाठी शासनाने सायकल,दुचाकी उपलब्ध करून द्यावी. त्यांच्या कामाचा मोबदला व सोई सुविधा वाढवून मिळवा,त्यांना सन्मान मिळावा” अशी मागणी करणार असल्याचे विधानपरिषद उपसभापती मा.ना.निलम गो-हे यांनी संगितले. त्या भोर – वेल्हे –मुळशी सामाजिक व शैक्षणिक क्रिडा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कोरोना योद्धा नागरी सत्कार कार्यक्रमात बोलत होत्या. या कार्यक्रमात डॉक्टर्स,नर्स,आंगणवाडी सेविका,सफाई कर्मचारी,पत्रकार यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. याचे आयोजन शलाका कुलदीप कोंडे (आदर्श जि.प.सदस्य) आणि पुनमताई अमोल पांगारे पंचायत समिति सदस्य यांनी केले. शिवनेरी मंगल कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चंदेरे, रमेश कोंडे, सहसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे, तालुका प्रमुख माऊली शिंदे, युवराज जेधे, महिला आघाडी संघटिका संगीता पवळे, स्वाती ढमाले, निशा सपकाळ, युवा सेनेचे अविनाश बलकवडे, अमोल पांगारे, नितिन सोनवले, नारायण कोंडे, गणेश खुटवड ,महेश कोंडे, दत्ता देशमाने, प्रांत राजेंद्र जाधव,तहसीलदार अजित पाटील, आनंद गोयल उपशहर प्रमुख .आदी मान्यवर उपस्थित होते.
छायाचित्र :कोरोना योद्ध्यांचा सत्कार करताना नीलमताई गो-हे व अन्य मान्यवर