आरटीओ पुणेचे दिवे ऑफिसमध्ये असलेले २८ एकर जागेमध्ये ११४० झाडांचे रोपण केले आहे. व आजून २००० झाडांचे रोपण होणार आहे. यातील ५ एकर जागेत २००० झाडे लावली जाणार आहे. या वृक्षारोपणासाठी रोटरी क्लब हडपसर सेंट्रल व विघ्नहर्ता गोल्ड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३००००/- तीस हजार रुपयांची मदत केली आहे. हा संपूर्ण प्रकल्प आरटीओ निरीक्षक संतोष झगडे, आणि इतर आरटीओ अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार होत आहे. या प्रसंगी विघ्नहर्ता गोल्डचे रो.महेंद्र लुणिया, रो.शारदा लुणिया, रो.रंजन पराडकर,रोटरी क्लब हडपसर सेंट्रलचे अध्यक्ष रो.संपत खोमणे, सचिव रो.दीपक गायके, खजिनदार आरती कदम, रो वामन भुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ हडपसर सेंट्रलच्या वतीने वृक्षारोपणास मदत प्रदान.
Tags: #aaj ka anand, #lokmat, #loksatta, #maharashtratimes, #pudhari, #punya nagri, #rotarydist3131, #sakal, #samna