पोलिस बॉईज ऑर्गनायझेशन,महाराष्ट्र राज्याच्या राज्य अध्यक्षपदी आशिष साबळे पाटील यांची निवड.

Share This News

स्वारगेट पोलिस कॉलनी मधील गणेश मंडळांचा कार्यकर्ता,युवा नेतृत्व श्री.आशिष साबळे पाटील यांची काल पोलिस बॉईज ऑर्गनायझेशन,महाराष्ट्र राज्य ह्या पोलीसांसाठी काम करणाऱ्या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी निवड झाली आहे,संघटनेच्या आजी माजी पदाधिकारी व सदस्य यांच्या बैठकीत हा ठराव संमत करण्यात आला आहे. आशिष साबळे हे गेले अनेक वर्ष पोलीस कर्मचारी यांच्या बाजूने अनेक विषयांवर उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहे,ससून हॉस्पिटल च्या डॉक्टरांनी पोलिसांना केलेली मारहाण असेल तेव्हा ही त्यांनी पोलिसांच्या बाजूने मोर्चा काढला होता, एका मोठ्या संघटने मार्फत पोलीसांना जेव्हा पोलीसांवर खोटे आरोप केले तेव्हा ही त्यांनी पोलिसांची बाजू अगदी मंत्रालय पासून ते पुणे पोलीस आयुक्त यांच्या पर्यंत मांडली,निलंबित पोलीसांना ही खात्यात लवकर समाविष्ट करण्यासाठी त्यांनी शासन दरबारी आंदोलनाचा पवित्रा घेतला होताच ह्याच त्यांच्या कामाची दखल घेऊन आणि पोलीसांना ही आपलेसे वाटणारे नेतृत्व म्हणून सर्वानुमते त्यांना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
आशिष साबळे हे स्वतः पोलीस पाल्य (लाईन बॉय) असून सर्वसामान्य पोलीस कर्मचारी यांच्यात त्यांची चांगली,आक्रमक,मनमिळावू म्हणून ओळख आहे!!!
एका पोलीसाच्या मुलाला ही जबाबदारी मिळाली आहे म्हणून सर्व पोलीस खात्यात आनंद असून,एक हक्काचा माणूस आता पोलीसांच्या साठी आलाय ही भावना सर्व सामान्य पोलीस व्यक्त करत आहेत.

येणाऱ्या वर्षभरात पुणे,पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात बांधणी करणार असून नंतर सर्व महाराष्ट्रभर काम करणार असून सर्व पोलीस लाईन येथे शाखा बांधणी तसेच पोलीसांच्या मुलांना शिक्षणासाठी शासनाची तरतूद, पोलीसांचे मेडिक्लेम जे हॉस्पिटल ने रद्द केलेत ते पुर्वरत करणे,पोलीसांच्या पाल्यांना पोलीस भरती मध्ये ठराविक जागांची तरतूद करणे, रिटायर्ड पोलीस यांना पेन्शन संदर्भात होणारा त्रास आणि ह्या पुढे सर्वसामान्य पोलीस कर्मचारी आणि चांगल्या अधिकारी यांची ताकत ही संघटना बनेल असे श्री. साबळे पाटील यांनी सांगितले.
आणि ह्या पुढे पोलीसांच्या साठी मंत्रालय ते पुणे पोलिस मुख्यालय फक्त पोलीस बॉईज ऑर्गनायझेशन चा च आवाज घुमेल असे साबळे यांनी सांगितले.