क्रांतिकार्याची साक्ष देणारे हुतात्मा स्मारक आणि पुण्यातील ऐतिहासिक फलकांच्या दुरावस्थेविषयी

Share This News

काल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि कार्यकारी अभियंता शिवाजी लंके यांची भेट घेवून हुतात्मा चौकातील स्मारकाची दुरावस्था निदर्शनास आणून दिली. पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंपाशी नाम फलक अथवा माहिती फलक बसविणे आणि जुने माहिती फलक दुरुस्ती करण्याबाबत देखील निवेदन दिले.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील बुधवार चौकातला (हुतात्मा चौक) मजूर अड्डा आणि फरासखाना ही जुन्या पुण्याची ओळख सांगणारा स्मृतिस्तंभ मात्र आज विस्मृतीच्या गर्तेत जात आहे. स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारक भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या कार्याची महती सांगणारे हे स्मारक असून सदर स्थळाची दुरावस्था झाली आहे स्मारकावर सिगरेटची पाकीटं, कचरा, अवतीभवती झोपणारी लोकं, भिकारी, अतिक्रमण केलेले विक्रेते यांच्या विळख्यात हे स्मारक अडकले आहे.

तसेच पुण्यातील ऐतिहासिक महत्व असलेल्या वास्तूंना माहिती फलक देखील नाहीत आणि जे आहेत त्यांची दुरावस्था झाली आहे.
७ जुलै ला , पुण्याच्या इतिहासाचा मानबिंदू समजल्या जाणाऱ्या आणि मराठ्यांच्या इतिहासाच्या संशोधनाचा केंद्रबिंदू असलेल्या ‘भारत इतिहास संशोधक मंडळाचा’ स्थापनादिन. या वास्तूची स्थापना ७ जुलै १९१० ला इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि तात्यासाहेब मेहेंदळे यांनी केली. पुण्याच्याच नव्हे तर हिंदुस्थानच्या गौरवाची साक्ष देणारे दस्तावेज ज्या वास्तूत अभ्यासले गेले आणि संग्रहित आहेत अश्या वास्तूचे महत्व कथन करणारा माहिती फलक लावण्याचा निर्णय घ्यावा. जेणेकरून भविष्यात या वास्तूकडून प्रेरणा घेऊन इतिहास अभ्यासक घडावेत यासाठी हा निर्णय घ्यावा ही विनंती केली.

याचबरोबर शहरात ज्या ऐतिहासिक वास्तूंपाशी बसविलेल्या माहिती फलकांची दुरावस्था झाली आहे ते त्वरित बदलावेत हे निदर्शनास आणून दिले. उदा. भरत नाट्य मंदीर व हुजूरपागा प्रशाला. तसेच शहरातील इतर वारसा स्थळांची सूची बनवून, तज्ञांकडून माहिती मागवून सदर ठिकाणी माहिती फलक लावावे ही मागणी वारसा प्रेमी पुणेकरांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली.

यावर सकारात्मक प्रतिसाद देत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्येक वॉर्ड ऑफिसर ला पत्र पाठवून याबाबत कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचे सांगितले.

नुकताच २०२१ ग्लोबल मेयर्स चॅलेंजेस चॅम्पियन सिटीज मध्ये पुण्याचा जगभरातील ६३१ पैकी ५० महापौरांच्या यादीत समावेश झाला असून ही स्पर्धा जिंकायची असल्यास पुण्याचा आत्मा असणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

आज महापौरांची भेट घेवून यांसंदर्भात
निदेवन दिले. सदर स्मारकाची लवकरात लवकर स्वछता करून आणि त्याचा माहिती फलक लावण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अन्यथा पुणेकरांच्या माध्यमातून आंदोलन उभारले जाईल याची नोंद घ्यावी असे कळवले.

स्मार्ट सिटी अंतर्गत किंवा सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली नवी स्मारके उभी करण्यापेक्षा आहेत त्या जुन्या वारसा स्थळांचे संवर्धन होणे गरजेचे आहे असे मला वाटते.

यावेळी मनसे स्वयंम रोजगार चे महेश महाले आणि चित्रपट सेना कोथरूड विभाग प्रमुख जयराज भिसे उपस्थित होते.

सदर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुण्याच्या वारसा प्रेमींना घेवून जन आंदोलन उभारेल हे महापौरांना कळवले असून पुण्यातील वारसा वास्तूंचे भविष्यात योग्य संवर्धन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

आपला कृपाभिलाषी,

अ‍ॅड.गणेश सातपुते
उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
+91 98230 23444