रोटरी क्लब पिंपरीच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन.

Share This News

रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.रोटरी क्लब पिंपरीचे माजी अध्यक्ष मेहुल परमार व मेडिकल डायरेक्टर डॉ.मनिष फरांदे यांनी आयोजन केले.यात रोटरी क्लब निगडी,कल्याणीनगर,आकुर्डी, उद्योग नगरी यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी संयोजक मेहुल परमार, मनिष फरांदे,रोटरी क्लब पिंपरीचे अध्यक्ष अभिजीत शिंदे,रोटरी क्लब निगडीचे अध्यक्ष जगमोहन बुर्जी रोटरी कल्याणी नगरचे अध्यक्ष राजीव शरण,रोटरी क्लब आकुर्डीचे अध्यक्ष गौरव शर्मा,रोटरी क्लब उद्योगनगरीचे अध्यक्ष योगेश टिपरे आदि मान्यवर उपस्थित होते. शिबिरात ३२ जणांनी रक्तदान केले. शिबिराचे तांत्रिक संचालन पिंपरी सिरोलोजिकल इन्स्टिट्यूट  ब्लड सेंटरने केले. कार्यवाहक म्हणून रोटरॅक्ट(युवा)क्लब पिंपरी व रोटरॅक्ट(युवा)क्लब कल्याणीनगरने कार्य केले.  

छायाचित्र :रक्तदान शिबीर प्रसंगी मान्यवर.